शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दीपाली काळे पुन्हा चौकशीच्या फेºयात कोठडीत मारले, आंबोलीत जाळले प्रकरण; ‘सीआयडी’कडून सांगलीत स्वतंत्र तपास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:08 IST

सांगली : शहर पोलिस ठाण्यातून अनिकेत कोथळे व अमोल भंडारे पळून गेल्याचा बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याने रचलेल्या बनावाबाबत सांगलीच्या तत्कालीन पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची

सांगली : शहर पोलिस ठाण्यातून अनिकेत कोथळे व अमोल भंडारे पळून गेल्याचा बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याने रचलेल्या बनावाबाबत सांगलीच्या तत्कालीन पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची सीआयडीकडून चौकशी केली जाणार असल्याचे अप्पर पोलिस उपअधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी सोमवारी सांगितले. गेल्या आठवड्यात या गुन्ह्याचा स्वतंत्रपणे तपास आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

सांगली शहर पोलिसांनी लूटमारप्रकरणी ६ नोव्हेंबरला अनिकेत व अमोलला अटक केली. कोठडीच्या पहिल्याचदिवशी अनिकेत व भंडारेला चौकशीसाठी ‘डीबी’ रूममध्ये आणले. कामटेच्या पथकाने या दोघांपैकी अनिकेतला उलटा टांगून बेदम मारहाण केली होती. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता.

हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी कामटे, बडतर्फ हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी, अनिकेत व अमोल भंडारे हिसडा मारुन ‘डीबी’ रूममधून पळून गेल्याचा बनाव रचला. यासंदर्भात कामटेने स्वत: शहर पोलिस ठाण्यात दोघे पळून गेल्याची फिर्याद दाखल केली होती. अनिकेतचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळल्याचे उघडकीस आले. गेल्या आठवड्यात हा तपास सीआयडीकडेच वर्ग केला. कामटेने आरोपी पळून गेल्याची फिर्याद कोणत्याआधारे दिली? ही फिर्याद कोणी दिली? त्यावर सही कोणी केली? याचा तपासातून उलगडा केला जात आहे. घटनेदिवशी तत्कालीन पोलिस उपअधीक्षक दीपाली काळे यांनी शहर पोलिस ठाण्यातील कोठडीला भेट देऊन आरोपी तपासले होते. त्यावेळी त्यांना अनिकेत व अमोल नसल्याचे लक्षात आले. त्यांनी चौकशी केल्यानंतर ते दोघेही पळून गेल्याची माहिती कर्मचाºयांनी दिली होती. त्यामुळे सीआयडीकडून त्यांना चौकशीसाठी बोलाविले जाणार आहे.चौकशीनंतर गुन्हे , अटकेची कारवाईअनिकेत कोथळेप्रश्नी विधानसभेत १४ आमदारांनी तारांकित प्रश्न व दोन आमदारांनी लक्षवेधी मांडल्याने सीआयडीचे अधिकारी तपासाची माहिती घेऊन नागरपूरला रवाना झाले होते. त्यामुळे गेली आठ दिवस तपास थांबला होता. हे अधिकारी रविवारी सांगलीत दाखल झाले. अप्पर पोलिस अधीक्षक गायकवाड म्हणाले, अनिकेत व अमोल भंडारे पळून गेलेल्या बनावाचा तपास सुरू आहे. चौकशीदरम्यान कोण दोषी आढळला तर, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई केली जाईल.